*वटपौर्णिमा*💐💐💐💐💐💐💐💐*
*वटपौर्णिमा*💐💐💐💐💐💐💐💐*आज सकाळी नसरापूर बनेश्वर येथे मॉर्निंग वॉक ला जाताना नेहमीच ओळख असलेल्या वटवृक्षा जवळ पोहचलो, येता जाता त्या वटवृक्षाची एक प्रदक्षिणा पूर्ण होतेच हा जसा नित्यानियमच झाला आहे,पण आज जरा चित्र वेगळेच होते, वडाच्या पारंब्या खेळण्या बागडण्यात जरा जास्तच मग्न होत्या, आज त्यांच्यावर बंधने नव्हतीच,जवळच पुरातन काळातील ऐतिहासिक शंभू महादेवाचे मंदिर असल्याने त्याला साक्ष ठेवून बऱ्याच सुवासिनी येथे येऊन गेल्या होत्या कारण वृक्षा भोवती गुंडाळलेल्या धाग्यांची संख्या अगणित होती,ते वटवृक्ष सर्व सुवासिनींनी केलेल्या मनोकामना पूर्ण करण्यात व्यस्त होते,आणि यामुळेच पारंब्या अगदी मनसोक्त पणे हुंदडत होत्या, एका हलक्या हवेचा प्रवाह सुध्दा त्यांना बागडन्यात मदत करत होता,मला दुरूनच पाहून ,पारंब्या आणखीनच डोलायला लागल्या, तशी त्यांची माझी रोजचीच ओळख त्यांना हलकासा स्पर्श केल्याशिवाय मी पुढे जातच नसे, पण आज माझी पाऊले तिथेच थबकली,क्षणात पौराणिक कथा आठवली, सावित्री हे भारतीय संस्कृतीतील एक ऐतिहासिक पात्र,सावित्रीच्या पतीनिष्ठा, पतिव्रता, कर्तव्यधर्माच्या विवंचनेमुळे यमराज प्रसन्न झाले, सत्यवानाने वटवृक्षाखाली प्राण त्याग केल्यानंतर यमराज त्याला न्यायला आले पण सावित्री पुढे त्यांचेही काही चालेना, मग यमराजाने सावित्रीला कोणतेही तीन वर मागायला सांगितले त्यातीलच पुत्र प्राप्तीसाठी मागितलेला वर यमराज तथास्तु म्हणाले आणि त्यांना सत्यवान शिवाय पुन्हा यमलोकी जावे लागले अशी कथा आपण सर्वच अनंत काळापासून ऐकत आलो आहोत,मला पण मी भारतीय असल्याचा जणू गर्वच वाटू लागला,आपल्याकडे गुढीपाडवा, होळी, दीपावली,रक्षा बंधन असे बरेच सण उत्साहाने साजरे केले जातात,परदेशात हे चित्र क्वचितच पाहायला मिळत असेल,आपल्या भोवती आई,आजी, मावशी,आत्या,बहीण,कन्या, भार्या,सून मैत्रीण अशी अनेक स्त्री रूपे पाहायला मिळतात, खरेतर यांच्या शिवाय आपले अस्तित्वच नाही, या सगळ्याच आपल्याला दीर्घायुष्य मिळावे म्हणून नेहमीच कोणते ना कोणते वृत करत असतात, किती ही अपार निष्ठा, यांच्या मुळेच आपल्यावर किंवा आपल्या वास्तूवर येणारी संकटे नकळतपणे टळतात, यामुळे आपणही यांचे काही देणे लागतो, आपल्या कडून कळत नकळतपणे नेहमीच चुका होत असतात,त्यातील नकळतपणे झालेल्या चुका गंगेत गेल्यावर धुवून जातीलही पण जाणूनबुजून केलेल्या चुका गंगेत न्हाऊन सुध्दा पवित्र होणार नाहीत,आपले अंतर्मन हे एक न्यायालय आहे खोटे किंवा चुकीचे वागताना तर ते कधीच आपली साथ देत नाही, त्यामुळे नेहमी अंतर्मनाच्या विरोधात कोणता निर्णय घेऊ नका, क्षणांचा मोह टाळा,निरर्थक अपेक्षा टाळा कारण त्याने भविष्यात येणारी बरीच संकटे टळतात, विधात्याने बनवलेली सृष्टी ही खूप सुंदर आहे फक्त आपल्या पाहण्याचा दृष्टिकोन कसा आहे यावर सर्व काही अवलंबून आहे बारकाईने विचार केला बरेच काही आपल्याला विनामूल्य मिळालेले आहे, जे आहे ते खूप आहे जसे आहे ते ही खूप सुंदरच आहे असे मान्य करून आपण जर समाधानी राहिलो तर आपल्या सारखा सुखी कोणीच नाही,गरजूंना शक्य तेवढी मदत करत चला, ईश्वराने आपल्याला देणाऱ्यांच्या यादीत समाविष्ट केले आहे मागणाऱ्यांच्या नाही,**हिंदी मध्ये एक म्हण प्रचलित आहे,**💐किसी गरीब की मदत के लिये आप अपने हात खोल दो उपरवाला आपके लिये अपना दिल खोल देगा💐**मित्रांनो अगदी सहजच शब्द सुचत गेले आणि शब्द रचना तयार झाली, काल फक्त विनोद होते त्यामुळे आज काहीतरी वेगळे असावे असे वाटले स्वधर्म बरोबरच इतर धर्मीयांचा सुध्दा आदर असावा म्हणून हा सगळा खटाटोप,वाचल्यावर तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा.
Thank you
ReplyDeleteNice artical
ReplyDelete