Posts
Showing posts from July, 2024
💐💐💐💐💐*जिवलग मित्रांनो सप्रेम नमस्कार,*🌹🌹🌹🌹🌹🌹🌹*अतिशय सुंदर अश्या निसर्गरम्य ठिकाणी आपला स्नेहमेळावा पार पडला, आजच्या दिवसाची आपण सर्वच अतिशय आतुरतेने वाट पहात होतो, आजचा दिवस उजाडला तोच मुळी आनंदाची पर्वणी घेऊनच, सकाळच्या प्रहरी सर्व जबाबदारीची कामे ऊरकून जो तो आपल्या मार्गाने मार्गस्थ झाला घाटरस्ता आणि नागमोडी वळणे पार करून निसर्गाच्या सानिध्यात ज्या ठिकाणी आपण सर्वांनीच आयुष्याचा अतिशय सुंदर सुवर्णकाळ घालवला,ज्या ठिकाणी खेळताना बागडताना आपली पाऊले उमटली असतील अशा ऐतिहासिक शहरात स्नेह मेळाव्याचे आयोजन,आणि बालपणीच्या मित्रांना भेटायची उत्सुकता म्हणजे आनंदाची पर्वणीच, कार्यक्रमाचे नियोजन सुंदर अश्या निसर्गरम्य आल्हाददायक ठिकाणी, पावसाळा नसतानाही पाऊस पडून गेल्या मुळे दरवळणारा मातीचा सुगंध ,बालपणीच्या मित्रांची गळाभेट ,मनसोक्त गाणी म्हणण्याचा आनंद, उत्साह वाढवणारा टाळ्यांचा कडकडाट, उत्कृष्ठ अश्या जेवणाचा आस्वाद, यापेक्षा आयुष्यात अजून सुंदर असे काय हवे, ज्याने आजच्या दिवसाला हजेरी लावली तो भाग्यवानच ,आपल्या सोबतच कुमारी,ऋतुजा,नेहा आणि जैद यांनीही कार्यक्रमाचा आनंद घेतला ,पूर्ण दिवस धमालच धमाल, अजून एक आनंदाची बातमी म्हणजे श्री संजय कडू सरांनी आपले स्वप्न साकार केले,स्वतःची गाडी घेतल्यावरच गाडी शिकणार असा पन त्यांनी केला होता आणि तो क्षण प्रत्यक्षात साजरा झाला, त्यांच्या जवळ जाताच त्यांनी क्षणात गाडीची चावी माझ्याकडे दिली,याचा मला अतिशय आनंद झाला,त्यांचा मान ठेवत मी गाडी घेऊन छोटासा फेरफटका मारला, आपल्या कुटुंबात अजून कोणीतरी सामील झाल्यासारखे वाटले, पाहता पाहता एकमेकांचा निरोप घ्यायची वेळ आली, या वेळेला काही क्षण थांबवता आले असते तर ? क्षणभर असेच वाटले, पण असे काही होत नसते, अश्या फक्त कल्पनाच आपण करू शकतो, निसर्गाचा नियम आपण बदलू शकत नाही, शेवटी तिसरी घंटा वाजली,काही मित्रांचा प्रवास लांबचा असल्यामुळे कार्यक्रम आटोपता घ्यावा लागला, एकमेकांचा निरोप घेताना डोळे आपसूकच पाणावले, जड अंतःकरणाने आपण सर्वांचा निरोप घेतला पण सोबत होता बऱ्याच दिवस पुरेल इतका उत्साह आणि आनंद, मित्रांनो असेच पुन्हा पुन्हा भेटूया आणि अश्या सुंदर क्षणांचा आस्वाद घेऊया, सर्वांचा निरोप घेऊन सर्वजण पुन्हा एकदा परतीच्या प्रवासाला निघालो पण स्वतःला फुल चार्ज करुन आणि भरपूर एनर्जी घेऊन , आजच्या दिवसाचा आनंद, उत्साह पुढील बरेच दिवस आपल्या सर्वांना आनंद देत राहील एवढे मात्र नक्की, मित्रांनो पुन्हा पुन्हा असेच भेटत राहू आणि अश्या सुंदर क्षणांचे साक्षीदार होऊ, वेळे अभावी किंवा इतर काही कारणास्तव बाकी मित्र आले नाहीत त्यांनी पुढच्या वेळी नक्की यायचेच आहे ही आग्रहाची विनंती, जे मित्र आज आले त्यांचे पुन्हा पुन्हा आभार,🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹*
- Get link
- X
- Other Apps
*वटपौर्णिमा*💐💐💐💐💐💐💐💐*
- Get link
- X
- Other Apps
*वटपौर्णिमा*💐💐💐💐💐💐💐💐*आज सकाळी नसरापूर बनेश्वर येथे मॉर्निंग वॉक ला जाताना नेहमीच ओळख असलेल्या वटवृक्षा जवळ पोहचलो, येता जाता त्या वटवृक्षाची एक प्रदक्षिणा पूर्ण होतेच हा जसा नित्यानियमच झाला आहे,पण आज जरा चित्र वेगळेच होते, वडाच्या पारंब्या खेळण्या बागडण्यात जरा जास्तच मग्न होत्या, आज त्यांच्यावर बंधने नव्हतीच,जवळच पुरातन काळातील ऐतिहासिक शंभू महादेवाचे मंदिर असल्याने त्याला साक्ष ठेवून बऱ्याच सुवासिनी येथे येऊन गेल्या होत्या कारण वृक्षा भोवती गुंडाळलेल्या धाग्यांची संख्या अगणित होती,ते वटवृक्ष सर्व सुवासिनींनी केलेल्या मनोकामना पूर्ण करण्यात व्यस्त होते,आणि यामुळेच पारंब्या अगदी मनसोक्त पणे हुंदडत होत्या, एका हलक्या हवेचा प्रवाह सुध्दा त्यांना बागडन्यात मदत करत होता,मला दुरूनच पाहून ,पारंब्या आणखीनच डोलायला लागल्या, तशी त्यांची माझी रोजचीच ओळख त्यांना हलकासा स्पर्श केल्याशिवाय मी पुढे जातच नसे, पण आज माझी पाऊले तिथेच थबकली,क्षणात पौराणिक कथा आठवली, सावित्री हे भारतीय संस्कृतीतील एक ऐतिहासिक पात्र,सावित्रीच्या पतीनिष्ठा, पतिव्रता, कर्तव्यधर्माच्या विवंचनेमुळे यमराज प्रसन्न...